Team WebNewsWala
क्राईम शहर

मास्क न घालणाऱ्या बाईची पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण Video Viral

मास्क न घालणाऱ्या बाईची पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण Video Viral. घटनास्थळी एका व्यक्तीने या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला.

मास्क न घालणाऱ्या बाईची पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण Video Viral

मुंबई – सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा लाॅकडाऊन देखील चालू केलं आहे तर अनेक ठिकाणी संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहून सरकारने अनेक कठोर नियम आणि दंड लागू केले आहेत. यादरम्यान एका महिलेने नियमांचं उल्लंघन केल असून चौकशी केल्यानंतर महिलेने पालिका कर्मचाऱ्याची पिटाई केल्याची घटना समोर आली आहे.

मास्क घालणे तसेच सोशल डिस्टंन्सिंग राखणं अशा सूचना नागरिकांना सतत देण्यात येत आहेत. मात्र लोक कोरोना आणि त्याच्या नियमांना गांभार्याने घेत नसल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून दिसत आहे. मुंबईमध्ये एक महिला विनामास्क फिरत असताना महिला पालिका कर्मचाऱ्याने तिला सवाल केला. या गोष्टीचा महिलेला प्रचंड राग आला असून तिने महिला पालिका कर्मचारिकेला मारायला सुरुवात केली.

मास्क न घालणाऱ्या बाईची पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण Video Viral

दरम्यान, घटनास्थळी एका व्यक्तीने या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. तसेच महामारी पसरवण्यासाठी व्हिडीओमधील महिल्यांसारखे लोक कारणीभुत आहे, अशा कमेंट्स करण्यात येत आहेत.

पालिका कर्मचारिकेने चुकीच्या पद्धतीने पकडल्याचा दावा

मारहाण केल्यानंतर पालिका कर्मचारिकेने चुकीच्या पद्धतीने पकडल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे. मात्र व्हिडीओमध्ये पालिका कर्मचारी केवळ महिलेला थांबवताना दिसत आहे. व्हिडीओमधल्या महिलेने पालिका कर्मचारिकेला फक्त मारहाण नाही तर अपमानस्पद शब्द वापरुन शिवीगाळ देखील करताना दिसत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत घरांचे स्वप्न साकार

Web News Wala

बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली विकतात साखरेचा पाक

Team webnewswala

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघीण महिनाभरापासून बेपत्ता

Team webnewswala

Leave a Reply