Team WebNewsWala
अर्थकारण राष्ट्रीय

व्यवसायासाठी मुद्रा लोन मिळवण्याची सुवर्णसंधी

मुद्रा कर्जासाठी तुम्हाला कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही. तुम्हाला मुद्रा कर्ज मिळाल्यास तुम्हाला मुद्रा कार्डदेखील दिले जाईल.

व्यवसायासाठी मुद्रा लोन मिळवण्याची सुवर्णसंधी मुद्रा योजनेंतर्गत कोणत्याही हमी शिवाय कर्ज दिले जाते. मुद्रा कर्जासाठी तुम्हाला कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. मुद्रा योजनेंतर्गत तुम्हाला मुद्रा कर्ज मिळाल्यास तुम्हाला मुद्रा कार्डदेखील दिले जाईल. या कार्डच्या मदतीने जेव्हा व्यवसायात आर्थिक गरज असते तेव्हा आपण पैसे खर्च करू शकता.

शिशु, किशोर आणि तरुण लोन म्हणजे काय ?

मुद्रा कर्ज योजनेंतर्गत 10 लाखांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते. जर तुम्हाला यामध्ये आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला शिशु कर्जाची म्हणजेच 50 हजार रुपयांची मदत मिळेल. त्याचबरोबर किशोर मुद्रा कर्ज योजनेंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतची कर्जे मिळू शकतील.

तरूण कर्ज प्रकारात 10 लाखांपर्यंतची सुविधा दिली जाऊ शकते. मुद्रा योजनेंतर्गत लघु उत्पादक युनिट, दुकानदार आणि फळ व भाजीपाला विक्रेते कर्ज घेऊ शकतात.

अर्ज कसा करावा ?

सर्व प्रथम, आपल्या कर्जाची आवश्यकता किती आहे हे आपण निश्चित करा. आवश्यक असेल तेव्हढ्याच कर्जासाठी अर्ज करा. कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुद्रा योजनेच्या वेबसाइटवर जाऊन आवश्यक फॉर्म भरावा लागेल. येथे आम्ही आपल्याला एक लिंक देत आहोत

https://www.mudra.org.in

ही कागदपत्रे आवश्यक

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय देखील मुद्रा कर्ज देते. आपण एसबीआयकडे अर्ज केल्यास, ओळखपत्र, अ‍ॅड्रेस प्रूफ, बँक स्टेटमेंट, आपला फोटो, विक्री कागदपत्रे, जीएसटी क्रमांक आणि आयकर विवरण परतावा अशी कागदपत्रे आवश्यक असतील.

परंतु जर बँक मुद्रा कर्ज देण्यास टाळाटाळ करत असेल तर आपण त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. येथे आम्ही राज्यवार टोल-फ्री नंबर देऊ, ज्यावर मुद्रा कर्ज न मिळाल्यास बँकेची तक्रार केली जाऊ शकते.

‘ह्या’ नंबरवर दाखल करा कम्प्लेंट

काही राज्यांचे स्पेशल नंबर देण्यात आले आहेत. तर राष्ट्रीय स्तरासाठी 2 क्रमांक जारी करण्यात आले आहे. 1800-180-1111 आणि 1800-11-0001 दोन्ही राष्ट्रीय स्तरीय क्रमांक आहेत. आपण देशातून कोठूनही या बद्दल तक्रार करू शकता.

याशिवाय उत्तर प्रदेश18001027788

उत्तराखंड18001804167

बिहार18003456195

छत्तीसगढ़18002334358

हरियाणा18001802222

हिमाचल प्रदेश18001802222

झारखंड18003456576

राजस्थान18001806546

मध्य प्रदेश18002334035

महाराष्ट्र18001022636 या नंबरवर तक्रार करू शकता.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

Team webnewswala

रिझर्व्ह बँकेचा QR Code साठी नवा नियम

Team webnewswala

पालिकेकडून BEST ला कर्जपुरवठा

Web News Wala

Leave a Reply