राष्ट्रीय

मुंबई CSMT पुनर्विकास साठी अदानीसह या 9 कंपन्या शर्यतीत

मुंबई CSMT पुनर्विकासाची योजना रेल्वेने आखली आहे. या पुनर्विकासासाठी गौतम अदानी यांच्या अदानी रेल्वेजसह नऊ कंपन्या शर्यतीमध्ये आहेत.

मुंबई CSMT पुनर्विकास साठी अदानीसह या 9 कंपन्या शर्यतीत

Webnewswala Online Team – मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ( मुंबई CSMT ) पुनर्विकासाची योजना रेल्वेने आखली आहे. या पुनर्विकासाच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी गौतम अदानी यांच्या अदानी रेल्वेजसह जीएमआर एंटरप्रायझेस, ओबेरॉयल रियाल्टी यासह एकूण नऊ कंपन्या शर्यतीमध्ये आहेत. इंडियन रेल्वे स्टेशन्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (IRSDC) ने ही माहिती दिली आहे.

CSMT रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंट योजनेंतर्गत या स्टेशनचे रूपांतर एका मिनी स्मार्ट सिटीमध्ये करण्याचा विचार आहे. येथे लोक राहतीत, काम करतील, खेळतील आणि ट्रेनमधून प्रवासही करतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होईल. तसेच व्यवसायाच्या संधीही उपलब्ध होतील.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. लोहिया यांनी सांगितले की, सीएसएमटी स्टेशनच्या पुनर्विकासासाठी नऊ कंपन्यांची RFQ (रिक्वेस्ट फॉर क्वोटेशन)साठी निवड झाली आहे.

कॉट्रॅ्क्ट मिळवण्यासाठी नऊ कंपन्या शर्यतीत

गोदरेज प्रॉपर्टीज,

एंकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स,

आयएसक्यू आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट,

कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन,

मॉरिबस होल्डिंग प्रा.लि.

बीआयएफ आयव्ही इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग डीआयएफसी प्रा.लि.

आयआरएसडीसीने सांगितले की, या स्टेशनच्या पुनर्विकासावर सुमारे १ हजार ६४२ कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे. हा खर्च डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सपोर्ट DBFOT च्या आधारावर काम करेल. रेल्वे खासगी क्षेत्रातील सहकार्यामधून एकूण १२३ रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची योजना आखत आहे. रेल्वे या ज्या १२३ रेल्वे स्टेशनवर पुनर्विकासाची योजना आखत आहे. त्यापैकी ६३ स्टेशनवर आयआरएसडीसी आमि ६० स्टेशनवर आरएलडीए काम करेल. या सर्व स्टेशनच्या पुनर्विकासावर सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

Web Title – मुंबई CSMT पुनर्विकास साठी अदानीसह या 9 कंपन्या शर्यतीत ( 9 companies are in the race with Adani for Mumbai CSMT redevelopment )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

हिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा

Web News Wala

दिवाळीत सोन्याचे दर स्वस्त होणार की महाग ?

Team webnewswala

गुगल पे येणार नव्या स्वरूपात

Team webnewswala

Leave a Reply