Team WebNewsWala
नोकरी राजकारण समाजकारण

शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळणार 80 हजार बेरोजगारांना नोकऱ्या

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खासगी, निमशासकीय कंपन्यांमध्ये किमान 80 हजार बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प

मुंबई : १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना त्यानिमित्त खासगी, निमशासकीय कंपन्यांमध्ये किमान 80 हजार बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने केला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

80 हजार बेरोजगारांना नोकऱ्या

शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करताना, बेरोजगारांच्या हाताला काम देता येईल का, याचा विचार करण्यात आला. किमान काही बेरोजगारांना त्यानिमित्त रोजगार मिळवून देण्याची योजना राबविण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

महास्वयंम’ पोर्टलवर सोमवारपासून नोंदणी

हा कार्यक्रम कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. ‘महास्वयंम’ पोर्टलवर सोमवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली असून १२ डिसेंबपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. या ठिकाणी जे लोक नोंदणी करतील, त्यांना रोजगाराची संधी उपब्ध करून दिली जाईल, असे मलिक यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गोरेगावमध्ये तकीला डान्स बारवर छापा

Team webnewswala

वैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी

Web News Wala

पुण्यात सुरु झाले वॉरिअर आजीबाई चे मार्शल आर्ट्स क्लास

Team webnewswala

Leave a Reply