Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय

मोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. तसंच आता याचा खर्च केंद्र लसीकरणाची तयारी

मोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर

Webnewswala Online Team – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. तसंच आता याचा खर्च केंद्र सरकारच उचलणार असून कोणत्या राज्यांना किती लसींचे डोस दिले जातील याची माहिती आठवडाभरापूर्वीच देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर आता केंद्र सरकारनं तब्बल 74 कोटी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

“काही राज्यांनी गेल्या महिन्यात लसींच्या डोसची खरेदी केंद्र सरकारमार्फत केली जावी असं म्हटलं होतं. सध्या कोविशिल्डच्या २५ कोटी आणि कोवॅक्सिनच्या १९ कोटी डोसेसची ऑर्डर कंपन्यांना देण्यात आली आहे. ही एक अॅडव्हान्स ऑर्डर आहे. यासाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंटही केलं जाईल. केंद्र सरकारनं एकूण ७४ कोटी अॅडव्हान्स डोसची ऑर्डर दिली आहे,” असं पॉल म्हणाले. सप्टेंबर महिन्यापर्यंत काही बायोलॉजिकल लसी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी ३० कोटी डोसेसची ऑर्डरही देण्यात आल्याचं पॉल म्हणाले.

Web Title – मोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर ( 74 crore dose order prepared for free vaccination )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

खासदार रविकिशन यांना आता Y + Security

Team webnewswala

रिलायन्स : कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण

Web News Wala

जगातील सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका INS विराट 100 कोटीस विकण्यास तयार

Team webnewswala

1 comment

मोफत लस&#23... June 11, 2021 at 1:28 pm

[…] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. तसंच आता याचा खर्च केंद्र लसीकरणाची तयारी  […]

Reply

Leave a Reply