Team WebNewsWala
व्यापार

अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करण्यासाठी ७० प्रस्ताव

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीने निवडक उपकंपन्या विकून कर्जाच्या विळख्यातून स्वतःची सुटका करुन घेण्याचे प्रयत्न सुरू
 मुंबईः अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीने निवडक उपकंपन्या विकून कर्जाच्या विळख्यातून स्वतःची सुटका करुन घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या उपकंपन्या खरेदी करण्यासाठी आतापर्यंत ७० प्रस्ताव आले आहेत. एसबीआय लाइफ या कंपनीने रिलायन्स कॅपिटलची रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स ही कंपनी खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे जाहीर करुन प्रस्ताव सादर केला आहे. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या उपकंपन्या खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत संपली आहे.
एसबीआय लाइफ रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स खरेदी करण्यास उत्सुक
रिलायन्स कॅपिटलच्या रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स या कंपनीत जपानची सर्वात मोठी विमा कंपनी निप्पॉन लाइफ यांचे ४९ टक्के मालकी हक्क आहेत. रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स या कंपनीकडे सप्टेंबर २०२०च्या अखेरीस २१ हजार ९१२ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स या कंपनीचे शेअर बाजारातील मूल्य सप्टेंबर २०२ ०च्या अखेरीस १ हजार १९६ कोटी रुपये असल्याचे जाहीर करण्यात आले.
कर्जभार कमी करण्यासाठी अनिल अंबानी विकणार कंपन्या
कमिटी ऑफ डिबेंचर होल्डर्स अँड डिबेंचर ट्रस्टी विस्तारा आयटीसीएल इंडिया रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या उपकंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया राबवत आहे. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीवर सुमारे २० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ९३ टक्के कर्ज विस्तारा आयटीसीएल इंडिया यांच्याकडून घेण्यात आले आहे. याच कारणामुळे कमिटी ऑफ डिबेंचर होल्डर्स अँड डिबेंचर ट्रस्टी विस्तारा आयटीसीएल इंडिया रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या उपकंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया राबवत आहे. विस्तारा आयटीसीएल इंडिया यांना एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि जे एम फायनॅन्शिअल सर्व्हिसेस या दोन कंपन्या सल्ला देत आहेत.
२०१९-२० आर्थिक वर्षात ३५ कोटी रुपयांचा नफा
रिलायन्स कॅपिटलच्या रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स या कंपनीला २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपले त्यावेळी ३५ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे जाहीर करण्यात आले. याच कारणामुळे रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स खरेदी करुन स्वतःचा व्यावसाय वाढवण्यास एसबीआय लाइफ ही कंपनी उत्सुक आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मॉरिशस तेल गळती जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

Team webnewswala

United Spirits च्या CEO पदी हिना नागराजन

Team webnewswala

मंदीत Smartphone मार्केटमध्ये चांदी

Web News Wala

Leave a Reply