Team WebNewsWala
राष्ट्रीय

Jammu Kashmir CRPF ताफ्यावर ग्रेनेड हल्ला 7 जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका CRPF ताफ्यावर पोलीस पार्टीवर ग्रेनेट हल्ला केल्याचं वृ्त्त आहे. या हल्ल्यात सात पोलीस जखमी

Jammu Kashmir CRPF ताफ्यावर ग्रेनेड हल्ला 7 जखमी 

Webnewswala Online Team –  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका CRPF ताफ्यावर पोलीस पार्टीवर ग्रेनेट हल्ला केल्याचं वृ्त्त आहे. या हल्ल्यात सात पोलीस जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील मुख्य बस स्थानकाजवळ ही घटना घडली. डीडी न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. (Militants hurl grenade at police party in J&K Pulwama seven injured) डीडीच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात जखमी झालेल्या सात पोलिसांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळाजवळील संपूर्ण भागात नाकाबंदी केली आहे. पण या घटनेबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. दरम्यान, अशाच पद्धतीचा हल्ला दहशतवाद्यांनी २६ मे रोजी त्राल भागातचं केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या दिशेने ग्रनेड फेकले होते. या हल्ल्यात कोणालाही इजा किंवा जीवितहानी झाली नव्हती. तसेच याच वर्षी १२ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या सांबा क्षेत्रात संशयीत दहशतवाद्यांनी पोलीस पार्टीवर ग्रेनेड फेकले होते. हा हल्ला झाला त्यावेळी पोलीस सांबा-उधमपूर मार्गावर वाहनांची तपासणी करत होते.

Web Title – Jammu Kashmir CRPF ताफ्यावर ग्रेनेड हल्ला 7 जखमी ( I7 injured in grenade attack on Jammu Kashmir CRPF convoy )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Statue Of Unity ला रेल्वे नेटवर्कद्वारे जोडणार

Web News Wala

SBI च्या idea ने होऊ शकतात पेट्रोल डिझेल चे दर कमी

Web News Wala

७००० रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी

Team webnewswala

Leave a Reply