Team WebNewsWala
Other शहर

पश्चिम रेल्वेवर 7 AC लोकल प्रवाशांच्या सेवेत

पश्चिम रेल्वेवर करोनाकाळात टप्प्याटप्यात दाखल झालेल्या आणखी तीन AC लोकल लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील. त्या विरार ते चर्चगेट मार्गावर
मुंबई : पश्चिम रेल्वेवर करोनाकाळात टप्प्याटप्यात दाखल झालेल्या आणखी तीन AC लोकल लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील. सध्या लोकल प्रवासाची मुभा केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना व महिलांना असल्याने त्या नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेत येतील, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. त्या विरार ते चर्चगेट मार्गावर चालवल्या जातील.

२०१७ मध्ये पहिली AC लोकल दाखल

डिसेंबर २०१७ मध्ये पहिली AC लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल झाली. त्यानंतर टप्प्याटप्यात या लोकल ताफ्यात येऊ लागल्या. डिसेंबर २०१९ पर्यंत पश्चिम रेल्वेवर चार वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. चर्चगेट ते विरार मार्गावर लोकल चालवताना त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. करोनाकाळात या लोकल बंदच होत्या. नुकतीच ही सेवा पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. तरीही प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद आहे.

करोनाकाळात आणखी तीन लोकलही पश्चिम रेल्वेकडे

चार लोकल सेवेत असतानाच करोनाकाळात आणखी तीन लोकलही पश्चिम रेल्वेकडे आल्या आहेत. मार्चमध्ये पाचवी, सप्टेंबरमध्ये सहावी आणि २ डिसेंबरला सातवी वातानुकूलित लोकल दाखल झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. सध्या चार लोकल सेवेत असून उर्वरित तीन लोकल कशा चालवायच्या याचे नियोजन सुरू आहे. दाखल झालेल्या तीनपैकी दोन लोकल मार्च २०२१ पर्यंत, तर एक लोकल मार्चनंतरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गाडीला प्रतिसाद थंडच

सात महिन्यांपेक्षाही जास्त काळ पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल बंद होती. १५ ऑक्टोबरपासून AC लोकल सुरू झाली. या लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या होतात. सध्या वातानुकूलित लोकल गाडीला अल्प प्रतिसादच आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत १,०२३ तिकीट आणि ६६७ पासची विक्री झाली होती. डिसेंबरमध्ये ३३१ तिकीट आणि २२३ पासची विक्री झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

एका वातानुकूलित लोकलची प्रवासी क्षमता ५,९६४ आहे. परंतु करोनाकाळात एका लोकलमधून ७०० प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असे गणित रेल्वेने मांडले आहे. परंतु या वातानुकूलित लोकल गाडीला त्याहीपेक्षा खूपच अल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या मध्य रेल्वेवरही एक वातानुकूलित लोकल ठाणे ते पनवेल मार्गावर असून ती करोनाकाळात बंदच ठेवली आहे. परंतु करोनाच्याही आधी त्याला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळालेला आहे. 

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कांदा जेवणातून गायब होणार कांद्याचा दर गगनाला भिडणार

Team webnewswala

हॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनाचा अडथळा

Team webnewswala

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघीण महिनाभरापासून बेपत्ता

Team webnewswala

Leave a Reply