Team WebNewsWala
राष्ट्रीय

नौदलाची वाढणार ताकद बांधण्यात येणार 6 स्वदेशी पाणबुड्या

नौदलाची ताकद वाढण्यासाठी 6 अत्याधुनिक स्वदेशी पाणबुड्या बांधण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नौदलाची वाढणार ताकद बांधण्यात येणार 6 स्वदेशी पाणबुड्या

Webnewswala Online Team – भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद वाढण्यात येणार आहे. त्यादृष्टीने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने (Defence Ministry) आज शुक्रवारी महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. नौदलाची ताकद वाढण्यासाठी 6 अत्याधुनिक स्वदेशी पाणबुड्या बांधण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकल्प रखडला होता. आता त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पूर्णपणे स्वदेशी पाणबुड्या

भारतीय नौदलासाठी बांधण्यात येणाऱ्या या पाणबुड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असणार आहे. या 6 अत्याधुनिक पाणबुड्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकवर केली जाणार आहे. पाणबुडीच्या निर्मितीचे हे काम माझगाव डॉक लिमिटेड आणि एल अॅण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे.

‘प्रोजेक्ट 75- इंडिया’ अंतर्गत या 6 पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नौदलासाठी या पाणबुड्या निर्मिती करण्यासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पाचे काय आहे वैशिष्टय ?

समुद्री ताकद वाढविण्यासाठी भारतीय नौदलाने 75-I हा प्रकल्प हाती घेतला आहे. यात 6 पाणबुड्यांच्या निर्मिती केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यांचा आकार सध्याच्या स्कॉर्पिअन क्लास पाणबुडीपेक्षाही पाच पटीने मोठा असेल. तर या पाणबुड्या डिझेल आणि इलेक्ट्रीक असणार आहेत.

भारताकडे सध्या एकूण 140 युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. तर पाकिस्तानकडे फक्त 20 युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. मात्र चीनचा वाढता धोका लक्षात घेता भारताला संरक्षण भर द्यावा लागणार आहे. तसेच समुद्र क्षेत्रात अधिक शक्तिशाली होण्याची गरज असल्याने आगामी काळात नौदलाची ताकद वाढविण्याची योजना भारताने केली आहे.

Web Title – नौदलाची वाढणार ताकद बांधण्यात येणार 6 स्वदेशी पाणबुड्या ( 6 indigenous submarines will be built to increase the strength of the Navy )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Central Vista Project चा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने केला मोकळा

Web News Wala

लवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम

Team webnewswala

काय आहे Google Tax, कंपन्यांना लागेल Equalisation levy

Web News Wala

Leave a Reply