Team WebNewsWala
Other शहर

भिवंडी दुर्घटना मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत राज्य शासनाच्या वतीने जाहीर
भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे : भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री श्री. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून श्री. शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी जाहीर केले. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सागरी किनारा मार्गासाठी प्रवाळ स्थानांतर काम सुरू

Team webnewswala

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं लिहिलं रक्तानं पत्र

Team webnewswala

१ फेब्रुवारीपासून मुंबई मेट्रोच्या वेळेत बदल

Web News Wala

Leave a Reply