Team WebNewsWala
ऑटो पर्यावरण राष्ट्रीय

5 मिनिटात चार्ज होणारी OLA E Scooter बाजारात

जगातील सर्वात मोठा ईव्ही स्कूटरचा प्लांट उभारण्यात येत असून त्यामध्ये दर दोन सेकंदाला एक OLA E Scooter तयार केली जाणार आहे.

5 मिनिटात चार्ज होणारी OLA E Scooter बाजारात

बेंगलुरू : भारतीय बाजारात ईलेक्ट्रीक स्कूटर एका मागोमाग एक अशा लाँच होऊ लागल्या आहेत. बजाज, टीव्हीएस, हिरो, इथर, ओकिनावासारख्या देशी-विदेशी कंपन्यांच्या स्कूटर आल्या आहेत. परंतू देशात कॅब सेवेद्वारे हातपाय पसरलेली ओला कंपनी (Ola Electric Mobility Pvt) मोठा धमाका करणार आहे. जगातील सर्वात मोठा ईव्ही स्कूटरचा प्लांट उभारण्यात येत असून त्यामध्ये दर दोन सेकंदाला एक OLA E Scooter तयार केली जाणार आहे.

बाजारात असलेल्या E Scooter ची रेंज 70 ते 100 Km च्या आसपास 

तर त्या चार्ज करण्यासाठीदेखील तासंतास लागतात. परंतू OLA E Scooter अवघ्या 5 मिनिटांत फूल चार्ज होणार आहे. म्हणजेच पेट्रोल भरण्यासाठी रांगेत राहून ते पेट्रोल पंपावरून पैसे देऊन बाहेर पडण्याचा जो वेळ आहे त्यापेक्षा कमी वेळात ही स्कूटर चार्ज होणार आहे. तसेच या स्कूटरची रेंजही जास्त असणार आहे. या पहिल्या स्कूटरची झलक ओलाने दिली आहे.

OLA E Scooter चा अधिकृत फोटो

OLA E Scooter चा अधिकृत फोटो समोर आला आहे. पुढील काही महिन्यांत ही स्कूटर भारतात लाँच होईल. काही काळापूर्वी ओलाने Etergo ही कंपनी ताब्यात घेतली आहे. या कंपनीच्या जिवावरच ओला इलेक्ट्रीक स्कूटर घेऊन येत आहे. या स्कूटरमध्ये स्वॅपेबल हाय एनर्जी डेन्सिटी बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.
ही स्कूटर एका चार्जमध्ये 240 किलोमीटर जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एक्ट्रा बॅटरी बाळगली तर याची रेंज दुप्पट होणार आहे. या प्रक्रियेलाही केवळ ५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. स्वॅपेबल बॅटरी म्हणजे डिस्चार्ज बॅटरीच्या जागी दुसरी बॅटरी लावता येते. इतर फिचर आता हळूहळू समोर येणार आहेत. परंतू ही सुविधा मोठमोठ्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

500 एकरावर प्रकल्प

ओला या स्कूटर बनविण्यासाठी बंगळूरूमध्ये 500 एकरावर भलामोठा प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीच्या टॉपच्या पदाधिकाऱ्यांनी आंब्याची बाग असलेली जागा पाहिली आहे. या जागेत पुढील 12 महिन्यांत हा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकरल्पात वर्षाला दोन दशलक्ष स्कूटर तयार केल्या जाणार आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

वैष्णोदेवी यात्रेला सुरूवात २ हजार भाविकांनाच दर्शन

Team webnewswala

पुण्याची ‘सीरम’ आता बनवणार स्फुटनिक V लस

Web News Wala

कांजूरमार्ग मेट्रो कारशेड पर्यावरणवाद्यांचा विरोध

Team webnewswala

Leave a Reply