तंत्रज्ञान राष्ट्रीय

4G डाउनलोड स्पीड Reliance Jio पुन्हा अव्वल

दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा 4G डाउनलोड स्पीड मध्ये अव्वल ठरलीये. तर, अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोनने बाजी मारली आहे.

मुंबई : दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा 4G डाउनलोड स्पीड मध्ये अव्वल ठरलीये. तर, अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोनने बाजी मारली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे.

डाउनलोड स्पीडच्या बाबतीत सरासरी २०.८ एमबीपीएस स्पीडसह जिओची बाजी.

ट्रायच्या नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यातील डाउनलोड स्पीडच्या तुलनेत जिओचा स्पीड ३.० एमबीपीएस जास्त नोंदवण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात जिओचा 4G डाउनलोड स्पीड १७.८ एमबीपीएस होता. तर, नोव्हेंबरमध्ये भारती एअरटेलच्या कामगिरीमध्ये थोडीफार सुधारणा झाली. एअरटेलचा सरासरी 4 जी डाउनलोड स्पीड ऑक्टोबरच्या 7.5 एमबीपीएसच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 8 एमबीपीएस राहिला. दुसरीकडे, व्होडाफोन आणि आयडिया सेल्यूलर या दोन्ही कंपन्या व्होडाफोन-आयडिया म्हणून एकत्र आल्या असल्या तरी ट्राय मात्र दोन्ही कंपन्यांचे आकडे वेगवेगळे दाखवते. त्यानुसार, व्होडाफोनचा डाउनलोड स्पीड 9.8 एमबीपीएस आणि आयडियाचा स्पीड 8.8 एमबीपीएस इतका नोंदवण्यात आला.

अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन पहिल्या क्रमांकावर

अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोनने बाजी मारली आहे. सरासरी 6.5 एमबीपीएस अपलोड स्पीडसह व्होडाफोन पहिल्या क्रमांकावर, तर 5.8 एमबीपीएस अपलोड स्पीडसह आयडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन्ही कंपन्यांचा सरासरी अपलोड स्पीड अनुक्रमे 3.7 आणि 4 एमबीपीएस इतका नोंदवण्यात आला आहे. ट्रायकडून ‘मायस्पीड अ‍ॅप्लिकेशन’ च्या मदतीने सरासरी स्पीड मोजला जातो.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback

Web News Wala

काय आहे Google Tax, कंपन्यांना लागेल Equalisation levy

Web News Wala

SEBI चा गुंतवणूकदारांना दिलासा, IPO प्रक्रियेसाठी SMS सूचना लागू

Web News Wala

Leave a Reply