Team WebNewsWala
इतर शहर

सोलापुर भोसले राजघराण्याचा 373 वर्षे जुन्या राजवड्याचा बुरुज ढासळला

पावसाचा फटका भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याला बसला आहे. भोसले राजघराण्याचा 373 वर्षे जुन्या राजवड्याचा बुरुज ढासळला आहे.

परतीच्या पावसाने राज्यात धुमशान घातले आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्याभरात पावसाचा हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याला बसला आहे. भोसले राजघराण्याचा 373 वर्षे जुन्या राजवड्याचा बुरुज ढासळला आहे.

परतीच्या पावसाचा राजवाड्याला फटका

सोलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे 373 वर्ष जुना असलेल्या भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या राजवाड्याला फटका बसला आहे. अक्कलकोट संस्थानचा दुर्बीण बुरूज ढासळला आहे. अतिवृष्टी आणि झाडा झुडपांमुळे दुर्बीण बुरुज कोसळला आहे.

अक्कलकोट संस्थान गादीची स्थापना पहिले श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले यांनी केली होती. अक्कलकोट संस्थानने 373 वर्षांपूर्वी हा राजवाडा बांधला होता. छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र) यांनी अक्कलकोट संस्थानची 1707 साली निर्मिती केली होती.

ऐतिहासिक राजवड्याचा बुरुज ढासळला मुळे चिंता व्यक्त

या घटनेमुळे अक्कलकोट संस्थानच्या व्यवस्थापकांचे राजवाड्याकडे दुर्लक्ष असल्याचे उघड झाले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या जुन्या राजवड्याचा बुरुज ढासळला मुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

त्याचबरोबर, अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असं आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तसंच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 0217-2731012 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी केले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Team webnewswala

शहरात लवकरच धावणार 100 डबलडेकर बस

Team webnewswala

Versova Sea Link कामाला गती

Web News Wala

Leave a Reply