Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय समाजकारण

बेरोजगारांना आठवड्याला २२ हजार तर गरजूंना ४४ हजार

या नवीन आर्थिक मदतीमुळे बेरोजगारांना आठवड्याला ३०० डॉलर (२२ हजार रुपये) आणि गरजूंना ६०० डॉलर (४४ हजार रुपये) मदत दिली जाणार आहे.

न्यूयॉर्क : जगभरातील अनेक देशांना करोनाचा फटका बसला असला तरी जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसलाय. जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील अर्थव्यवस्था कोलमडल्याचं चित्र मागील काही महिन्यांमध्ये पहायला मिळालं. मात्र आता याच अर्थव्यवस्थांना उभारी देण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये आर्थिक मदतीची घोषणा केली जात आहे. अमेरिकेतील संसदेनेही ६६३ लाख कोटींचे म्हणजेच ९०० बिलियन डॉलर्सच्या करोना मदतनिधीची घोषणा केली आहे. या नवीन आर्थिक मदतीमुळे बेरोजगारांना आठवड्याला (२२ हजार रुपये) ३०० डॉलर आणि गरजूंना ६०० डॉलर (४४ हजार रुपये) मदत दिली जाणार आहे. सर्वाधिक फटका बसलेले उद्योग, शाळा आणि आरोग्य सेवांनाही या आर्थिक पॅकेजमधून मदत केली जाणार आहे.

बेरोजगारांना आठवड्याला २२ हजार रुपये गरजूंना ४४ हजार रुपये 

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन हे २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. यापूर्वीच त्यांनी सत्ता हाती घेण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्या आहेत. एका महिन्यात आम्ही परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करु. याच कामासाठी बायडेन आता स्वत:ची टीम वाढवत आहेत. बायडेन यांनी ट्विटवरुन, “एका महिन्यात आम्ही सारं काही ठीक करण्यास सुरुवात करणार आहोत,” असं म्हटलं आहे. बायडेन यांच्या टीमनेही सत्तांतर झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आम्ही जल आणि वायू प्रदुषणासंदर्भात जगातिक स्तरावर नेतृत्व करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. बायडेन यांनी करोना आर्थिक पॅकेज अमेरिकन नागरिकांना फायद्याचे ठरणार असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकेचं ९०० अब्ज डॉलर्सचं करोना पॅकेज

अमेरिकन संसदेने रविवारी ९०० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजसंदर्भात एकमत असल्याचं सांगितलं. या निधीचा वापर करोना काळामध्ये सर्वाधिक फटका बसलेले व्यापारी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी तसेच करोनाच्या लसीकरणासाठी केला जाणार आहेत. मागील बऱ्याच काळापासून या आर्थिक मदतीसंदर्भात चर्चा सुरु होती. अमेरिकन काँग्रेसनेही या आर्थिक मदतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. करोनामध्ये सर्वात वाईट परिस्थिती झालेल्या समाजातील खालच्या थरातील व्यक्तींना मदत करणे आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी निधी जाहीर करण्यासाठी बायडेन यांनी सहमती यापूर्वीच दर्शवली होती.

आर्थिक पॅकेजमधून बेरोजगार, गरजूंना मदत

अमेरिकेतील या आर्थिक पॅकेजमधून बेरोजगार, गरजूंना मदत केली जाणार आहे. या सर्व पात्र लोकांना आर्थिक भत्ते दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या निधीमधील काही भाग हा करोना लसीकरणासाठी वापरला जणार आहे. लसीकरण कशापद्धतीने करण्यात यावे यासंदर्भातील नियोजनापासून लस सर्व ठिकाणी पोहचवण्यासाठी यंत्रणा उभारण्यापर्यंत अनेक कामांसाठी या निधीतील ठराविक भाग वापरला जाणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

देशात निवृत्त कुत्रे आणि घोडे यांना पेन्शन मिळणार

Web News Wala

CoronaVirus News ‘या’ देशात झाला कोरोनाचा अंत

Web News Wala

2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित

Web News Wala

Leave a Reply