आंतरराष्ट्रीय आरोग्य

HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस कोरोना विषाणू

दक्षिण आफ्रिकेतील 36 वर्षीय HIV Positive महिलेमध्ये जवळपास 216 दिवसांपर्यंत कोरोना विषाणू. राहिल्याचं पाहायला मिळालं. या व्हायरसमध्ये 32 वेळा म्यूटेशन झालं.

HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस कोरोना विषाणू

Webnewswala Online Team – एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील 36 वर्षीय HIV पॉझिटिव्ह महिलेमध्ये जवळपास 216 दिवसांपर्यंत कोरोना विषाणूराहिल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान व्हायरसमध्ये 32 वेळा म्यूटेशन झालं. एका नव्या अभ्यासात हा खुलासा झाला आहे.

जेव्हा ही महिला 300 HIV पॉझिटिव्ह लोकांबाबत केलेल्या स्टडीमध्ये सहभागी झाली तेव्हा या प्रकरणाची माहिती मिळाली. यात असंही समोर आलं, की या महिलेशिवाय चार आणखी लोक असे होते, ज्यांच्या शरीरात कोरोना एका महिन्यापेक्षा अधिक काळापासून आहे.

ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, अशा लोकांमध्येही बराच काळ कोरोनाचा प्रादुर्भाव राहात असल्याचं पाहिलं गेलं आहे. मात्र, हे प्रकरण त्यापेक्षा वेगळं आहे.

दरम्यान, साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्येही 13 वेळा म्यूटेशन झालं. स्पाइक प्रोटीनची ओळख करुनच बहुतेक लसी परिणाम करत असतात. अद्याप याबाबतची माहिती मिळालेली नाही, की या महिलेतून हे म्यूटेशन इतर कोणामध्ये ट्रान्समिट झालं आहे का? यााबाबतचा एक शोध प्री-प्रिंट जर्नल medRxiv मध्ये प्रकाशित झाला आहे.

Web Title – HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस कोरोना विषाणू ( 216 days corona virus in the body of an HIV positive woman )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

लहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता

Web News Wala

काळी मिरी खाण्याचे बरेच फायदे

Web News Wala

पोटावरची चरबी घटवण्याचे पाच सोपे उपाय

Team webnewswala

Leave a Reply