Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय व्यापार

२१ डझन हापूस लंडनला निर्यात पहिल्या पेटीला ५१ पौंड दर

या वर्षीच्या आंब्याची पहिली मुहूर्ताची पेटी लंडनला निर्यात करण्यात आली. रत्नागिरी हापूस आंब्याच्या १ डझनाच्या २१ पेट्या लंडनमध्ये दाखल

युके च्या केतुल पटेल यांना पहिला हापूस आंबा खरेदी करण्याचा मान

फ्रूट ऑफ लेबनॉन (वेस्टर्न इंटरनॅशनल मार्केट, युके) च्या केतुल पटेल यांना या वर्षीचा पहिला २१ डझन रत्नागिरी हापूस आंबा खरेदी करण्याचा मान मिळाला. लंडनमधील इम्पोर्टर मराठी उद्योजक तेजस भोसले, कोकण ऍग्रो एक्सपोर्टचे उद्योजक दीपक परब यांच्या मदतीने कोकणातील अस्सल हापूस फेब्रुवारी महिन्यातच लंडनला दाखल झाला.

राजापूर पडवे गावातील बाबू अवसरे, कुंभवडे गावातील पंढरीनाथ आंबेरकर आणि वाडा तिवरे गावातील जयवंत वेल्ये यांना राजापूरमधील हापूस आंबा थेट शेतातून लंडनमध्ये निर्यात करण्याची संधी उपलब्ध झाली. ”कोकणातील भरपूर खनिजे असलेली, जांभा दगडाची लाल माती, समुद्राची आणि खाडीची खारी हवा, कोकणचा निसर्ग अशा अनुकूल वातावरणामुळे कोकणातील आंबा जगातील सर्वोत्तम आंबा समजला जातो.

युरोपच्या बाजारपेठेत १ लाख डझन आंबे थेट विक्री करण्याचे उद्दिष्ट

विजयदुर्ग खाडी परिसर, रत्नागिरी, देवगड, राजापूर परिसरातील आंबा हा प्रिमिअम आंबा आहे. पातळ साल, गोडसर चव, सोनेरी-केशरी रंगाचा आंबा या ठिकाणी पिकत असल्याने त्याला विशेष दर्जाही असतो. सर्वोत्तम शेतकरी, उत्तम बागा यांची निवड करून प्रिमिअम दर्जाचा आंबा बाजारात आणण्याचे आमचे ध्येय आहे. कोणताही भेसळ नसलेला आणि पूर्णतः नैसर्गिकरित्या पिकवलेला हा आंबा भारतातील आणि जगभरातील आंबा प्रेमींना उपलब्ध होईल” असा संकल्प केला असल्याचे यादवराव म्हणाले.

या वर्षी कोकणातून युरोपच्या बाजारपेठेत १ लाख डझन आंबे थेट विक्री करण्याचे उद्दिष्टही आहे. तेजस भोसले व सचिन कदम हे लंडनमधील दोन मराठी तरुण रत्नागिरी, राजापूर, देवगडमधील हापूस आंब्याचे युरोपच्या बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करत आहेत. तसेच आंब्याच्या थेट विक्रीसाठी बनविलेल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी सुशांत रावराणे आणि अजित मराठे या दोन कोकणातील उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे.

अधिक माहितीसाठी https://www.globalkokan.org/ या संकतेस्थळाला भेट द्या.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

चीनला दणका, गुगलने हटवले 2500 युट्यूब चॅनेल्स

Team webnewswala

करण जोहर च्या साथीने गौतम अदानी मनोरंजन क्षेत्रात

Web News Wala

आहारात मिठाच्या प्रमाणाबद्दल WHO च्या नव्या गाईडलाईन

Web News Wala

Leave a Reply