Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्राईम

२०२१ असणार भयानक, बाबा वेंगा ची भविष्यवाणी

भविष्यवेत्ते बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी सन २०२१ साठी आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे, जी मानल्यास २०२१ मध्ये २०२० वर्षापेक्षा जास्त समस्या

मुंबई: २०२० वर्ष संपत आहे आणि २०२१ समोर उभे आहे, हे वर्ष पूर्णपणे कोरोनाच्या (Corona) मगरमिठीत गेले. जगातील बर्‍याच देशांमध्ये कोरोनामुळे बरीच जीवितहानी झाली, तर सर्व आर्थिक, सामाजिक उपक्रम कोलमडले आणि कोरोना संकट अजूनही सुरूच आहे. दरम्यान, भविष्यवेत्ते बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी सन २०२१ साठी आश्चर्यकारक भविष्यवाणी (Prediction) केली आहे, जी मानल्यास २०२१ मध्ये २०२० वर्षापेक्षा जास्त समस्या उद्भवतील.

बाबा वेंगा हे बल्गेरियाचे भविष्यवेत्ते आहेत आणि यापूर्वी त्यांनी बर्‍याच महत्त्वाच्या घटनांसाठी केलेल्या अनेक भविष्यवाण्या अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रिन्सेस डायनाचा मृत्यू (१९९७), ९/११चा हल्ला, २०१० अरब स्प्रिंग आणि जपान त्सुनामी (२००४) यासारख्या ऐतिहासिक भविष्यवाण्या मोठ्या प्रमाणात सत्यात उतरल्या आहेत.

भारताची शक्तीही लक्षणीय वाढेल

आता बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार सन २०२१ मध्ये संपूर्ण जगाला भयंकर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो. आपत्तींचा पृथ्वीवरील मानवजातीच्या विचार करण्यावरही परिणाम होईल. त्याचबरोबर भारताच्या शक्तींमध्येही लक्षणीय वाढ होईल.

दुसरीकडे, युरोपला कदाचित सर्वात वाईट काळातून जावे लागेल. एवढेच नव्हे तर युरोपला या दरम्यानची बिकट आर्थिक परिस्थिती पहावी लागेल. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचे कट रचले जातील.

अमेरिकेला हरवून चीन जागतिक महासत्ता बनू शकते 

जर बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली तर येत्या काळात भारताचा शेजारील देश चीन अमेरिकेला मागे टाकून जागतिक महासत्ता बनू शकेल. त्याच वेळी बाबा वेंगा यांच्यानुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही भयानक आजाराच्या विळख्यात सापडतील. संपूर्ण जगाला संकटांना सामोरे जावे लागेल आणि विश्वासाच्या आधारे लोक विभागले जातील.

८५% भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत 

बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, असा दिवस येईल जेव्हा कर्करोगासारखा भयंकर आजार लोखंडी शृंखलाशी बांधला जाईल. १९११ मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे १९६६ मध्ये निधन झाले, परंतु जगाला निरोप देण्यापूर्वीच त्यांनी इसवीसन ५०७९ पर्यंतची भविष्यवाणी लिहिली, बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीपैकी ८५ टक्के भविष्यवाण्या अगदी बरोबर असल्याचे सिद्ध झाले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बैरूत जखमींसाठी मिया खलिफा ने जमवला ७४ लाखांचा निधी

Team webnewswala

मंदीमध्ये संधी अ‍ॅमेझॉन देणार एक लाख लोकांना रोजगार

Team webnewswala

लेहचा नकाशा चुकवल्यामुळे भारतात ट्विटरवर बंदी ?

Team webnewswala

Leave a Reply