Other अर्थकारण व्यापार

तब्बल 1600 भारतीय कंपन्या chinese money trap च्या विळख्यात

2016 ते 2020 काळात 600 हून अधिक भारतीय चीनकडून एफडीआय मिळाला आहे, तब्बल 1600 भारतीय कंपन्या chinese money trap च्या विळख्यात आहेत

एप्रिल 2016 ते मार्च 2020 या काळात 600 हून अधिक भारतीय कंपन्यांना विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून 102 कोटी 2.5 लाख डॉलर (सुमारे 7500 कोटी) स्वरूपात चीनकडून एफडीआय मिळाला आहे, तब्बल 1600 भारतीय कंपन्या chinese money trap च्या विळख्यात आहेत. अशी माहिती मोदी सरकारनं संसदेत दिली आहे.


एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत देशातील 1,600हून अधिक भारतीय कंपन्यांना चीनकडून एक अब्ज डॉलर्स थेट परकीय गुंतवणूक(एफडीआय) मिळाली. सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही आकडेवारी सादर करण्यात आली.

चिनी कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे ही वस्तुस्थिती आहे का, असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत 1,600 हून अधिक कंपन्यांना चीनकडून 102 कोटी 2.5 लाख डॉलर (सुमारे 7500 कोटी) थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मिळाली.

या कंपन्या 46 क्षेत्रातील आहेत. यापैकी ऑटोमोबाईल उद्योगातील कंपन्या, पुस्तकांचे प्रिंटिंग (लिथो प्रिंटिंग उद्योगासह), इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि विद्युत उपकरणांच्या कंपन्यांना या काळात चीनकडून 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त एफडीआय प्राप्त झाला.

काय आहे chinese money trap ?
ऑटोमोबाईल उद्योगात चीनकडून सर्वाधिक गुंतवणूक

आकडेवारीवरून असे दिसून येत की, ऑटोमोबाईल उद्योगाला चीनकडून सर्वाधिक 172 दशलक्ष डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक मिळाली. सेवा क्षेत्राला 13.96 दशलक्ष डॉलर्सची परदेशी गुंतवणूक मिळाली. राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय चिनी एजन्सींनी केलेल्या गुंतवणुकीची माहिती ठेवत नाही.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Google Facebook ला झटका ऑस्ट्रेलियामध्ये बातम्यांसाठी मोजावे लागणार पैसे

Team webnewswala

राज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त

Team webnewswala

‘सही रे सही’ नाटकाला १५ ऑगस्टला १८ वर्षे पूर्ण

Team webnewswala

Leave a Reply