Team WebNewsWala
आरोग्य शहर

लवकरच येणार स्वदेशी लस सरकारने दिले 1500 कोटी

Corona Vaccine देशाला चालू वर्षात मिळून करोनावरील लसींचे सुमारे 187 कोटी डोस उपलब्ध होऊ शकतील. त्यातून सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण होण्याचा विश्‍वास

लवकरच येणार स्वदेशी लस सरकारने दिले 1500 कोटी

Webnewswala Online Team – लवकरच येणार स्वदेशी लस हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई लिमिटेड सोबत केंद्र सरकारने करार केला असून या कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तीस कोटी डोस केंद्र सरकार विकत घेणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारेन दीड हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम कंपनीला दिली आहे. सध्या ही लस तिसऱ्या फेजच्या ट्रायल मध्ये आहे.

बायोलॉजिकल-ई कंपनीचे डोस ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तयार होणार असल्याची माहिती आहे. सध्या या लसीची चाचणी तिसऱ्या फेज मध्ये आहे. या आधीच्या दोन फेजमध्ये लसीचे रिपोर्ट प्रभावी आले आहेत. बायोलॉजिकल-ई कंपनीकडून तयार करण्यात येणारी लस ही आरबीडी प्रोटिन सब-युनिट लस असून येत्या काही महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे.

भारत सरकारकडून स्वदेशी लस निर्मितीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी विविध कंपन्यांना संशोधन आणि विकासाच्या कार्याला भारत सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. बायोलॉजिकल-ई या कंपनीच्या लसीसाठी भारत सरकारकडून प्री क्लिनिकल ट्रायलपासून स्टेज तीनच्या अभ्यासापर्यंत मदत करण्यात आली आहे. या कंपनीला 100 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत करण्यात आली असून इतरही प्रकारची सर्व मदत सरकारकडून करण्यात आली आहे.

सध्या देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा लसीकरणाच्या कार्यक्रमात वापर केला जात आहे. रशियाच्या स्पुटनिक V ची आयात करण्यात आली असून ती लवकरच वापरात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन लस फायझरच्या वापरालाही या महिन्यापर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title – लवकरच येणार स्वदेशी लस सरकारने दिले 1500 कोटी ( 1500 crore given by the government for the indigenous vaccine to come soon )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, पालिकेचं केंद्राला पत्र

Web News Wala

‘पाकवॅक’ पाकिस्तानने तयार केली कोरोना लस

Web News Wala

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गरेलपाडा गावात वीज

Team webnewswala

Leave a Reply