Team WebNewsWala
राष्ट्रीय शिक्षण

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा

कोरोना संकट आणखी पसरू नये म्हणून सीबीएसई आणि सीआयएससीई पाठोपाठ महाराष्ट्रासह 'या' राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांनी बारावीची परीक्षा रद्द केली.

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा

Webnewswala Online Team – कोरोना संकट आणखी पसरू नये म्हणून सीबीएसई आणि सीआयएससीई पाठोपाठ महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांनी बारावीची परीक्षा रद्द केली. आधी सीबीएसई आणि नंतर सीआयएससीई बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. सीबीएसई आणि सीआयएससीई या दोन्ही बोर्डांच्या निर्णयापाठोपाठ देशातील अनेक राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांनी बारावीची परीक्षा रद्द केली. No HSC exams in Maharashtra

महाराष्ट्र शासनाने बुधवारी बारावीच्या परीक्षेचा निर्णय विचाराधीन असल्याचे सांगितले होते. अखेर महाराष्ट्र शासनाने गुरुवार ३ जून २०२१ रोजी बारावीची परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले.

परीक्षा न घेता बारावीचा निर्णय कसा जाहीर केला जाणार या संदर्भातला फॉर्म्युला लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयाला सादर करणार असल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. याआधी राज्य शासनाने दाहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र परीक्षा न घेता दहावीचा निकाल कसा जाहीर करणार हा प्रश्न अनुत्तरित होता. आधी सरसकट मुलांना पुढल्या वर्गात प्रवेश देण्याची योजना विचाराधीन होती. मात्र हा प्रश्न न्यायालयात गेला.

उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर मूल्यांकनाचा एक फॉर्म्युला राज्य शासनाने तयार केला आहे. दहावीच्या संदर्भातल्या फॉर्म्युल्याला अद्याप न्यायालयाची संमती मिळालेली नाही. याआधीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी मूल्यांकनाचा फॉर्म्युला तयार करण्याचे काम सुरू करत असल्याचे संकेत राज्य शासनाने दिले. दहावी आणि बारावीच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेला न्यायालयाकडून संमती घेऊनच राज्यात अंमलात आणले जाणार आहे.

Web Title – महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा
(12th exams canceled by ‘this’ states including Maharashtra )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

NET च्या माध्यमातुन UGC ची 10 वर्षांत 100 कोटींची वसुली

Web News Wala

अकरावी प्रवेश पेच कायम

Team webnewswala

अर्थसंकल्पानंतर महागाई; LPG सिलिंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ

Web News Wala

Leave a Reply