Team WebNewsWala
तंत्रज्ञान शहर

सी लिंक आणि एक्सप्रेस वे वर १०० टक्के FastTag सुरू

वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे या दोन्ही रस्त्यांवर प्रजासत्ताक दिनापासून १०० टक्के FastTag व्यवस्था लागू करत असल्याचे एमएसआरडीसीने जाहीर

मुंबईः वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे या दोन्ही रस्त्यांवर प्रजासत्ताक दिनापासून १०० टक्के FastTag व्यवस्था लागू करत असल्याचे एमएसआरडीसीने जाहीर केले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार FastTag व्यवस्था लागू करत असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. भारतात १५ फेब्रुवारी २०२० पासून सर्व राष्ट्रीय महामार्गांवरचे टोलनाके जाऊन त्यांच्याजागी फास्टॅगसाठीच्या लेन येतील. पण निवडक रस्त्यांवर फास्टॅगची व्यवस्था जानेवारीपासूनच लागू होत आहे.

टोल नाक्याजवळ फास्टॅग विक्रीचा स्टॉल

वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे या दोन्ही रस्त्यांवर ११  जानेवारीपासून कार, जीप आणि एसयूव्ही कार यांना प्रत्येक फेरीसाठी पाच टक्के कॅशबॅक देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. टोल नाक्यावर फास्टॅग विकणारा स्टॉल सुरू केला. या उपक्रमांच्या माध्यमातून नियमितपणे वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्या जास्तीत जास्त वाहनांना फास्टॅग लावला जाईल यावर भर दिला गेला.

प्रजासत्ताक दिनापासून वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर १०० टक्के फास्टॅग व्यवस्था

आता प्रजासत्ताक दिनापासून वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे या दोन्ही रस्त्यांवर १०० टक्के फास्टॅग व्यवस्था असेल. ज्या वाहनांकडे फास्टॅग नसेल त्यांना टोल नाक्याजवळच्या स्टॉलवरुन फास्टॅग विकत घेऊन तो वाहनावर लावावा लागेल. फास्टॅग नसताना टोल नाक्यावरील फास्टॅगच्या मार्गिकेत प्रवेश करणाऱ्या वाहनांना टोल नाक्यावर दंड भरावा लागेल तसेच फास्टॅग लावून घ्यावा लागेल. पण टोलनाक्यावर येण्याआधीच जवळच्या स्टॉलवरुन फास्टॅग लावून घेणाऱ्यांना दंड भरावा लागणार नाही.

फास्टॅग लावून घेतल्यावर तो सक्रीय होण्यासाठी वेळ लागल्यास सकाळी काही तासांसाठी हायब्रिड मार्गिकेतून टोल नाका पार करता येईल. या मार्गिकेतील वाहनाने फास्टॅग लावून घेतल्याची पण तो सक्रीय होण्यासाठी वेळ लागत असल्याची खात्री करुन घेतली जाईल. यानंतर संबंधित वाहनाच्या चालकाला फक्त एकदाच रोख रक्कम भरुन टोल नाका पार करण्याची परवानगी दिली जाईल. दुसऱ्या फेरीपासून पुढे कधीही संबंधित वाहन टोल नाक्यावर आल्यास त्या वाहनाला फास्टॅगच्या माध्यमातूनच टोल भरावा लागेल.

FastTag व्यवस्थेत ऑनलाइन पद्धतीने टोल वसुली

FastTag व्यवस्थेत ऑनलाइन पद्धतीने टोल वसुली होते. यात नाक्यावर कोणालाही उभे राहून काम करावे लागणार नाही. कॅमेरा आणि सेन्सर यांच्या मदतीने काम होईल. झटपट टोल भरुन पुढील प्रवास सुरू करणे शक्य होईल. सुट्या पैशांचे वाद होणार नाही. ऑनलाइन व्यवहारांची नियमित नोंद होईल. या नोंदी एसएमएसच्या स्वरुपात मोबाइलवर उपलब्ध होतील. टोल वसुलीतील घोटाळ्याची शक्यता संपेल.

FastTag १०० टक्के लागू झाल्यावर टोल नाक्यावर पुढील काही दिवस फास्टॅगची विक्री करणारे करणारे स्टॉल असतील. नंतर स्टॉल बंद केले जातील. टोल नाक्यावर सुरक्षेसाठी आवश्यकता असेल तरच पोलीस नियुक्त केले जातील. एरवी टोलनाक्यावरील मनुष्यबळाची गरज संपेल आणि त्या कर्मचाऱ्यांना अन्य एखाद्या आवश्यक कामासाठी वळवता येईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

लेहचा नकाशा चुकवल्यामुळे भारतात ट्विटरवर बंदी ?

Team webnewswala

MumUni School Of Thoughts च्यावतीने अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना

Team webnewswala

भिवंडी लसीकरण केंद्राला खासदार कपिल पाटील यांची भेट

Web News Wala

Leave a Reply