Team WebNewsWala
सिनेमा

2021 मध्ये रिलीज होणार ‘हे’ 10 बिग बजेट चित्रपट

2021 या वर्षात अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. या चित्रपटांबाबत जाणून घेऊया. अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले.

2021 या वर्षात अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. या चित्रपटांबाबत जाणून घेऊया.

2020 हे वर्ष कोरोना व्हायरस महामारीमध्ये गेले. आता सर्वांनाच नवीन वर्षांमध्ये कोरोनावरील लसीसह नवनवीन गोष्टींचा अनुभव हवा आहे. 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे थेएटर बंद होते, अशात अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले. आता थेएटर उघडण्यास परवानगी मिळाली आहे, सोबतच काही धमाकेदार चित्रपट देखील नवीन वर्षात रिलीज होणार आहेत.

पठाण –

सिद्धार्थ आनंदचे डायरेक्शन असलेल्या या चित्रपटाद्वारे शाहरूख खान 2021 मध्ये कमबॅक करणार आहे. यात शाहरूखसोबतच दीपिका पादुकोण देखील दिसेल.

लाल सिंह चड्डा –

अमीर खानची प्रमूख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. कोरोनामुळे या वर्षी हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. आता डिसेंबर 2021 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. हा हॉलिवूड चित्रपट Forrest Gump चा रिमेक आहे.

सुर्यवंशी –
मल्टीस्टारर हा चित्रपट मार्च 2021 पर्यंत रिलीज होईल. चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार आहे.
83 –

हा चित्रपट दिग्गज भारतीय क्रिकेटपटू कपिलदेव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. यात रणवीर सिंह हा कपिलदेव यांची भूमिका साकारणार आहे. तर दीपिका पादुकोण पत्नीच्या भूमिकेत दिसेल.

बच्चन पांडे –

अक्षय कुमार आणि कृति सेनॉन यांची भूमिका असलेला हा चित्रपट देखील नवीन वर्षात रिलीज होणार आहे.

क्रिश 4 – 

ऋतिक रोशनच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक असलेल्या क्रिशचा चौथा भाग 2021 मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली.

अतरंगी रे –

अक्षय कुमार, सारा अली खान आणि धुनष यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट फेब्रुवारी 2021 मध्ये रिलीज होणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा असून, तिघेही कलाकार पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत.

मैदान –

स्पोर्ट्स ड्रामावर आधारित हा चित्रपट ऑगस्ट 2021 मध्ये रिलीज होईल. यात प्रमुख भूमिकेत अजय देवगण आहे.

MR. लेले –

धर्मा प्रोडक्शन अंतर्गत बनत असलेल्या या चित्रपट वरून धवन मुख्य भूमिकेत आहेत. त्याच्यासोबत जाहन्वी कपूर आणि भूमी पेडणेकर देखील दिसतील.

बेल बॉटम  –

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी 2021 हे वर्ष खास असणार आहे. कारण नवीन वर्षात त्याचे अनेक चित्रपट रिलीज होणार आहे. यात बेल बॉटमचा देखील समावेश आहे. यात अक्षयसोबत वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरैशी देखील असतील.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

“हंगामा 2′ देखील होणार OTT वर रिलीज

Web News Wala

राधे नंतर आता ‘मैदान’ OTT Platform वर रिलीज

Web News Wala

Saina Poster Trolling वर अमोल गुप्तेंचं सडेतोड उत्तर

Web News Wala

Leave a Reply