Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य

व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट

व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक घातक सापडल्याचे समोर आले आहे. व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट

व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट

Webnewswala Online Team – देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असतानाच आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, आता व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक घातक उपप्रकार (व्हेरिएंट) सापडल्याचे समोर आले आहे.

व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट

व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हेरिएंट भारत आणि इंग्लंडमध्ये आढणाऱ्या विषाणूपासून तयार झाला आहे. या कोरोना व्हेरिएंटच्या हवेतून प्रसाराचा वेग एरवीपेक्षा जास्त आहे.

व्हिएतनामधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा विषाणू भारत आणि इंग्लंडमधील कोरोना विषाणूच्या संगमातून तयार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण सात व्हेरिएंट आढळून आले आहेत. यामध्ये भारत व इंग्लंडमधील B.1.617.2 आणि B.1.1.7 व्हेरिएंटसचाही समावेश आहे.

गेल्यावर्षी व्हिएतनाम सरकारने कोरोनाची साथ यशस्वीपणे आटोक्यात आणली होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात व्हिएतनाममध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला होता.

व्हिएतनाममधील 63 शहरांपैकी 31 शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. सध्या याठिकाणी कोरोनाचे साधारण 3600 रुग्ण आहेत.

Web Title – व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट ( Airborne corona infection in Vietnam? Dangerous variant found )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

त्वचा आणि केसांच्या समस्येवर गुणकारी कोरफड चा रस

Web News Wala

IPL धमाका 19 सप्टेंबरपासून, बीसीसीआय सज्ज

Team webnewswala

बिग बास्केट खरेदी करत टाटा देणार रिलायन्स ला टक्कर

Web News Wala

Leave a Reply