Team WebNewsWala
ऑटो शहर

पर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू

मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू काशीद येथे समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी खूशखबर आहे. काशीद जेट्टीचे 60 टक्के काम पूर्ण झाले

पर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू

मुंबईतून काशीद येथे समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी खूशखबर आहे. सागरमाला योजनेतून काशीद येथ उभ्या राहत असलेल्या जम्बो जेट्टीचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2022 च्या सुरूवातीला ही जेट्टी जलवाहतूकीसाठी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबई ते काशीद हे अंतर फक्त दोन तासांवर येणार आहे. सध्या मुंबईतून काशीद येथे जाण्यासाठी रस्ते मार्गाने पाच तासांचा कालावधी लागतो.

मुरूड तालुक्यातील काशीद हे ठिकाण पर्यटनासाठी खूप प्रसिध्द आहे.या पर्यटनस्थळांमध्ये समावेश करण्यात आल्याने येथे परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी असते. मुंबईमधील लाखो पर्यटक काशीद समुद्रकिनारी फिरण्यासाठी येत असतात.

वर्षभरात सुमारे सात लाख पर्यटकांची काशीदला भेट

वर्षभरात सुमारे सात लाख पर्यटक काशीदला भेट देतात.या पर्यटकांना काशीदला पोहचण्यासाठी सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबईमधील पर्यटकांना एक तर जलमार्गाने मांडवा येथे यावे लागते, नाही तर रस्तेमार्गे अलिबाग येथून प्रवास करावा लागतो. या दोन्ही प्रवासाला अनुक्रमे साडेतीन ते पाच तासांचा कालावधी लागतो. मात्र काशीदमध्ये उभ्या राहत असलेल्या जम्बो जेट्टीमुळे हाच प्रवास आता फक्त दोन तासांवर येणार आहे. पर्यटकांच्या प्रवासाचा सुमारे तीन तासांचा कालावधी वाचणार आहे.

काम सुपरफास्ट

काशीदच्या जम्बो जेट्टीवर एकूण 112 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प काही काळ रखडला होता. हे काम सध्या वेगात सुरू असून वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सागरी महामंडळाचा प्रयत्न आहे. सध्या 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. उरलेले काम डिसेंबर 2021 च्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी व्यक्त केल आहे.

सुट्टीच्या दिवशी दहा हजार पर्यटक

काशीदच्या समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. साप्ताहिक आणि अन्य सुट्टीच्या दिवशी मुंबई शहरातील दहा हजार पर्यटक काशीदमध्ये असतात. या नवीन जेट्टीमुळे काशीदमधील पर्यटकांची संख्या वाढणार असून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.

Title – पर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू ( Tourism will get a boost, Mumbai to Kashid boat service will be started )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

ताजमहाल क्षेत्रातील 4000 झाड कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Web News Wala

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ऑनलाइन माहिती अधिकार प्रक्रिया सुरू

Team webnewswala

राजगृह वर दगडफेक करणारा माथेफ़िरू पोलिसांच्या ताब्यात

Team webnewswala

Leave a Reply