Team WebNewsWala
Other अर्थकारण आंतरराष्ट्रीय राजकारण

इराणी चलन गाळात; एका डाॅलरसाठी पाउणे तीन लाख रियाल

अमेरिका इराणमध्ये तणाव असून अमेरिका निर्बंध लावण्याच्या प्रयत्नात आहे. या तणावात इराणी चलन गाळात गेले असुन मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाले

तेहरान : अमेरिका आणि इराणमध्ये तणाव कायम असून आता अमेरिका पुन्हा एकदा निर्बंध लावण्याच्या प्रयत्नात आहे. या तणावात इराणी चलन गाळात मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाले आहे. इराणच्या नागरिकांना एका डॉलरसाठी जवळपास २ लाख ७२ हजार ५०० रियाल मोजावे लागत आहे.

इराणमध्ये जूनपासून आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रियालच्या किंमतीत ३० टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराण आपले कच्चे तेल जागतिक बाजारपेठेतही विकू शकत नाही. याआधी २०१५ मध्ये इराणी चलन डॉलरच्या तुलनेत घसरून ३२ हजार इतके झाले होते. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत केलेल्या दाव्यामुळे पश्चिम आशियात खळबळ उडाली आहे.

इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंध लादण्याची तयारी 

इराण या वर्षाखेरीस अणूबॉम्ब तयार करू शकतो, असा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्याने केला आहे. इराणचा हा संभाव्य धोका लक्षात घेता अमेरिकेकडून इराणवर पुन्हा एकदा नव्याने आर्थिक निर्बंध लादण्याची तयारी सुरू झाली आहे. अमेरिका इराणशी संबंधित असलेल्या आणखी काही व्यक्ती आणि संघटनांवर निर्बंध लागू करू शकते. अमेरिकेच्या निर्बंधानंतरही इराणने आपला अणू कार्यक्रम सुरूच ठेवला असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

इराणजवळ अणवस्त्र तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी

या अधिकाऱ्याने सांगितले की, इराणजवळ सध्या अणवस्त्र तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. उत्तर कोरियाच्या मदतीने इराण दूर पल्ल्याचा मारा करण्यास सक्षम असणारे क्षेपणास्त्र विकसित करत आहे. मात्र, या अधिकाऱ्याने आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी कोणताही पुरावा दिला नाही. अमेरिकेकडून निर्बंध लागू करण्यात येणाऱ्या व्यक्ती, संघटना या इराणचे क्षेपणास्त्र, अणवस्त्र आणि पारंपरीक शस्त्रनिर्मिती कार्यक्रमात सहभागी असल्याचा आरोप आहे.

इराणचा पश्चिम आशियातील प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील

इराणचा पश्चिम आशियातील प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. एकीकडे अमेरिका इराणवर निर्बंध लादत असताना दुसरीकडे अरब देश आणि इस्रायलमध्ये मैत्री करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे इस्रायलसोबत संयुक्त अरब अमिरात, बहरीन या देशांनी मैत्री करार केला आहे.

इराणवर निर्बंध आणण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Kia Motors बहुचर्चित Kia Sonet कॉम्पक्ट एसयूव्ही लाँच

Team webnewswala

राहुल बजाज यांचा बजाज फ़ायनान्स च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Team webnewswala

Cricket ब्लॉकबस्टर महिना, 24 दिवसांत 18 आंतरराष्ट्रीय सामने

Web News Wala

Leave a Reply