Team WebNewsWala
Other

इंधन दरवाढीवर FFV चा उपाय

केंद्र सरकार फ्लेक्स फ्युअलचा अर्थात फ्लेक्सिबल फ्यूल व्हेईकलच्या (FFV) उपक्रम घेऊन येत आहे. ज्यामुळे ग्राहकांना इंधनाचा पर्याय खुला.
इंधन दरवाढीवर FFV चा उपाय

सध्या देशभरात पेट्रोल आणि डीझेल यांच्या भाववाढीने कहर केला आहे. जागतिक बाजाराचा कच्च्या तेलाचे भाव कमी असूनही केंद्र व राज्य सरकारच्या अफाट करांमुळे इंधनाचे भाव भडकलेले आहेत. अशावेळी केंद्र सरकार फ्लेक्स फ्युअलचा अर्थात फ्लेक्सिबल फ्यूल व्हेईकलच्या (FFV) उपक्रम घेऊन येत आहे. ज्यामुळे ग्राहकांना इंधनाचा पर्याय खुला होऊन कमी किमतीत पेट्रोल मिळण्याची संधी खुली होणार आहे.

FFV म्हणजे काय ?

हा पर्याय आहे फ्लेक्स फ्युअलचा अर्थात फ्लेक्सिबल फ्यूल व्हेईकलच्या (FFV) याचा. होय, यामध्ये पेट्रोल आणि इथेनॉल यांचा ब्लेंडेड आणि अनब्लेंडेड पेट्रोल वापरण्याचा पर्याय ग्राहकांना खुला असेल. गाड्यांमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर वाढवण्यासाठी सरकार फ्लेक्सिबल फ्यूल व्हेईकलच्या (FFV) दिशेने गांभीर्यपूर्वक विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

FFV वाहन हे एक मॉडिफाइड व्हर्जन असेल. ज्यामध्ये पेट्रोल आणि इथेनॉल यांचा ब्लेंडेड आणि अनब्लेंडेड पेट्रोल किती आणि कसे वापरायचे हे ग्राहक ठरवतील. वेगवेगळे इथेनॉल मिळून पेट्रोलवर चालवले जाऊ शकणारी वाहने यात असतील. देशात सध्या पेट्रोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे.

FFV स्वीकारल्याने इंजिनात करावा लागेल बदल 

त्यातच बीएस ६ मानकांमुळे वाहनांचा खर्च वाढला आहे. अशावेळी २० टक्के ब्लेंडिंगपर्यंत जास्त बदल होणार नाही. मात्र, FFV स्वीकारल्याने इंजिनात बराच बदल करावा लागेल. त्यामुळे कार आणि वाहनांच्या किमतीत वाढ होऊ शकते. त्याचे नेमके काय धोरण असेल हे समजू शकलेले नाही.

पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांच्या म्हणण्यानुसार, गाड्यांमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर वाढवण्यासाठी सरकार फ्लेक्सिबल फ्यूल व्हेईकलच्या (एफएफव्ही) दिशेने गांभीर्यपूर्वक विचार चालू आहे. यामुळे लोकांना दर आणि सुविधेच्या आधारावर इंधन बदलण्याचा (पेट्रोल आणि इथेनॉल) पर्याय मिळतो. याचा ब्राझीलमध्ये यशस्वीरीत्या वापर चालू आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

यवतमाळ जिल्ह्यातील हल्लेखोर वाघिणीला पकडण्यात यश

Team webnewswala

10 कोटी स्मार्टफोन आणत Jio करणार फोन मार्केटवर कब्जा

Team webnewswala

नैराश्यावर मात करा एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय

Team webnewswala

Leave a Reply