Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत ७.८ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप

अमेरिकेत ७.८ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप त्सुनामीचा इशारा पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने दिला इशारा

अलास्काच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अमेरिकेत ७.८ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणापासून ३०० किमी परिघामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त असोसिएट फ्री प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

अमेरिकेतील  भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अँकोरेजपासून ५०० मैलांवर बुधवारी सहा वाजून १२ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांनी) सौम्य स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर पेरीवीलपासून ६० मैलावर पुन्हा भूकंपाचा मोठा धक्का बसला. “प्राथमिक भूकंपाच्या निकषांनुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून ३०० किमीच्या परिघामध्ये धोकादायक त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता आहे,” असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटलं आहे.

अलास्काच्या द्वीपकल्पापासून ते थेट दक्षिण अलास्कापर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. “अमेरिका तसेच कॅनडाच्या समुद्रकिनाऱ्यांबरोबरच उत्तर अमेरिकेतील समुद्र किनाऱ्यांना त्सुनामीचा किती धोका आहे यासंदर्भातील तपासणी सुरु आहे,” असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने नमूद केलं आहे.

शेकडो मैल परिसरामध्ये या भूकंपाचे धक्क जाणवले. “घरांमधील वस्तू जोरजोरात हलत होत्या. बराच काळ हा भूकंप जाणवत होता,” असं अलास्कापासून ४०० मैलांवरील भूकंपाचे केंद्रबिंदू असणाऱ्या परिसरातील स्थानिकांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त भूकंपाशी संबंधित एमएससी सीएसईएम डॉट ओआरजी या वेबसाईटने दिलं आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

टीम इंडियाला मिळाला नवीन किट स्पॉन्सर MPL

Team webnewswala

भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला

Web News Wala

वडिलांची वर्षभराची कमाई फक्त अमेरिका प्रवासावर खर्च सुंदर पिचाई

Team webnewswala

Leave a Reply